हैदराबाद - कोरोना विषाणूनं गेल्या सहा-सात महिन्यात अवघ्या जगात थैमान घातले आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 कोटी 43 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत जगभरामध्ये तब्बल 2 लाख 89 हजार 585 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 7 हजार 167 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिका, ब्राझिल, भारत, रशिया आणि दक्षिण अफ्रिका या देशांना बसला आहे.
जगभरात 2 कोटी 43 लाख 32 हजार 280 जणांना संसर्ग; तर 8 लाख 29 हजार 666 जणांचा बळी - जागतिक कोरोना रुग्ण संख्या
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 कोटी 43 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत जगभरामध्ये तब्बल 2 लाख 89 हजार 585 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 7 हजार 167 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 2 कोटी 43 लाख 32 हजार 280 वर गेली आहे. तर 8 लाख 29 हजार 666 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या विषाणूच्या प्रसाराची सुरुवात ही चीनमधून झाली होती. मात्र, चीनमध्ये सध्या कोरोना अटोक्यात आला आहे. जगभरातील 10 देशांमध्ये परिस्थिती गंभीर असून यात अमेरिका, ब्राझिल, भारत, रशिया, दक्षिण अफ्रिका, पेरू, मॅक्सिको, कोलंबिया, स्पेन आणि चिली देशांचा समावेश आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाची लस मिळविण्यासाठी विविध देशांच्या सरकारची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे कोरोना लस कधी येणार, याकडेच सर्वाचेच लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी कोरोना लसीची मानवी ट्रायल सुरू झाले आहे. तसेच कोरोना महामारीमुळे हवामान बदलावर काम करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे.