इस्लामाबाद - पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. यात चार जण ठार झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गुरुवारी उत्तर वजीरिस्तान जिल्ह्यात ही घटना घडली.
हेही वाचा -कंदहारमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 6 पोलीस जखमी
'सरकारी मालकीच्या नॅशनल इंजिनीअरिंग सर्व्हिस पाकिस्तानमधील कर्मचारी काही त्यांच्या कामाशी संबंधित नेमून दिलेल्या कामासाठी निघाले होते. त्या वेळी, त्यांच्या गाडीवर अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला,' अशी माहिती प्रांतातील गुप्तचर सूत्रांनी सिन्हुआ वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. मृतदेह जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तेथून ते परत त्यांच्या गावी पाठविले जातील, असे या सूत्रांकडून समजले आहे.
सध्या कोणत्याही गटाने किंवा व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हेही वाचा -अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, 8 जखमी