बलुचिस्तान- बलुचिस्तानमधील मशिदीत झालेल्या भीषण स्फोटात चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. क्वेटा शहराजवळील कुचलक येथील मशिदीत नमाजसाठी लोक जमा झाले होते. यावेळी हा स्फोट घडवून आणण्यात आला. कट्टरपंथीयांकडून हा हल्ला घडवण्यात आला असल्याची शक्यता आहे.
बलुचिस्तानमध्ये नमाजावेळी मशिदीत भीषण स्फोट; चार ठार, तर पंधरा जखमी
बलुचिस्तानमध्ये क्वेटा शहराजवळील कुचलक येथील मशिदीत भीषण स्फोट झाला आहे. यात चार नागरिकांना मृत्यू झाला आहे.
बलुचिस्तान
बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी एक आहे. हा भूभाग क्षेत्राच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत आहे, जो देशाच्या नैऋत्येकडील प्रदेश बनतो. परंतु या प्रदेशाची सर्वात कमी लोकसंख्या आहे. त्याची प्रांतीय राजधानी आणि सर्वात मोठे शहर क्वेटा आहे.