महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 4, 2020, 7:00 PM IST

ETV Bharat / international

पाकिस्तान : पंजाब प्रांतात 52 टक्के सक्तीची धर्मांतरे

डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, ‘सेंटर फॉर सोशल जस्टिस’ (सीएसजे) नावाच्या संस्थेने शनिवारी ऑनलाईन झालेल्या ‘जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आल्यासंबंधीच्या तक्रारी आणि धार्मिक स्वातंत्र्य’ या विषयावर चर्चा केली. यामध्ये ही बाब समोर आली. आकडेवारीनुसार, बळी पडलेल्यांपैकी 46.3 टक्क्यांहून अधिक मुली अल्पवयीन आहेत. त्यातील 11 ते 15 वयोगटातील 32.7 टक्के मुली आहेत. केवळ 16.67 टक्के पीडित मुली 18 वर्षांवरील वयाच्या असल्याचे आढळले आहे.

पाकिस्तान सक्तीची धर्मांतरे न्यूज
पाकिस्तान सक्तीची धर्मांतरे न्यूज

इस्लामाबाद - पाकिस्तानातील एका अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनेने दावा केला आहे की, महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या 52 टक्के घटनांची पाकिस्तानातील पंजाब प्रांतात नोंद झाली आहे. विशेषत: अल्पसंख्याक समाजातील तरुण मुलींचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आले आहे.

डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, ‘सेंटर फॉर सोशल जस्टिस’ (सीएसजे) नावाच्या संस्थेने शनिवारी ऑनलाईन झालेल्या ‘जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आल्यासंबंधीच्या तक्रारी आणि धार्मिक स्वातंत्र्य’ या विषयावर चर्चा केली. यामध्ये या बाबीचा खुलासा झाला.

सीएसजेने म्हटले आहे की, 2013 ते 2020 दरम्यान जवळजवळ 162 संदिग्ध धर्म परिवर्तनाचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. 1973 मधील पाकिस्तानी संविधानानुसार हे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे.

हेही वाचा -बलात्काऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानं मुलीला लावलं पणाला

सीएसजेच्या आकडेवारीनुसार, अशाच प्रकारच्या घटना पंजाबशिवाय सिंधमध्येही नोंदविण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रमाण 44 टक्के आहे. तर, संघीय आणि खैबर पख्तूनख्वा या भागात 1.23 टक्के तर, बलुचिस्तानमध्ये एका प्रकरणाची (0.62 टक्के) नोंद झाली आहे. गेल्या सात वर्षांत बहावलपूरमध्ये सर्वाधिक 21 अशा प्रकारच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे.

सीएसजेने म्हटले आहे की, आकड्यांवरून समजते की, पीडित तरुणींपैकी 54.3 टक्के हिंदू समुदायातील आहेत. तर, 44.44 टक्के ख्रिस्ती आणि 0.62 टक्के शीख आणि कलश समुदायातील आहेत.

आकडेवारीनुसार, बळी पडलेल्यांपैकी 46.3 टक्क्यांहून अधिक मुली अल्पवयीन आहेत. त्यातील 11 ते 15 वयोगटातील 32.7 टक्के मुली आहेत. केवळ 16.67 टक्के पीडित मुली 18 वर्षांवरील वयाच्या असल्याचे आढळले आहे.

हेही वाचा -पाकिस्तानच्या आर्थिक स्थिरतेसाठी एडीबीने केले 30 कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details