महाराष्ट्र

maharashtra

चीनमध्ये कोळसा खाणीतील दुर्घटनेत 8 जण ठार

By

Published : Nov 11, 2020, 2:26 PM IST

वायव्य चीनच्या शांक्सी प्रांतात कोळशाच्या खाणीत झालेल्या अपघातात 8 खाण कामगारांचा मृत्यू झाला आहे. बचावकर्त्यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा अपघात मागील आठवड्यात झाला. यातील शेवटचे चार मृतदेह मंगळवारी बाहेर काढण्यात आले. 4 नोव्हेंबरला स्थानिक वेळेनुसार 4.15 वाजता हा अपघात झाला होता. त्यावेळी 42 कामगार खाणीत होते.

चीनमध्ये कोळसा खाण दुर्घटना न्यूज
चीनमध्ये कोळसा खाण दुर्घटना न्यूज

बीजिंग - वायव्य चीनच्या शांक्सी प्रांतात कोळशाच्या खाणीत झालेल्या अपघातात 8 खाण कामगारांचा मृत्यू झाला आहे. बचावकर्त्यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा अपघात मागील आठवड्यात झाला. यातील शेवटचे चार मृतदेह मंगळवारी बाहेर काढण्यात आले. यानंतर बचावकार्य संपुष्टात आले.

हेही वाचा -होंडुरासमध्ये उष्णकटिबंधीय वादळ एटाने घेतले 57 बळी

घटनास्थळावरील बचाव मुख्यालयाच्या म्हणण्यानुसार, हे मृतदेह टोंगचुआन शहरातील कोळसा उद्योग कंपनी लिमिटेडच्या कोळशाच्या खाणीच्या शाफ्टमधून काढले गेले. 4 नोव्हेंबरला स्थानिक वेळेनुसार 4.15 वाजता हा अपघात झाला होता. यामध्ये अपघात झाला तेव्हा एकूण 42 खाण कामगार खाणीत कामाला होते. 34 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, असे वृत्त वृत्तसंस्था सिन्हुआने दिले आहे.

अद्याप अपघाताचे कारण समजले नसून तज्ज्ञ ते शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा -मेक्सिकोमध्ये कोसळधार! भूस्खलन आणि पूरात 27 लोकांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details