महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकिस्तान : प्रवासी वाहन खड्ड्यात कोसळून 8 जण ठार, 11 जखमी - पाकिस्तान अपघात न्यूज

या अपघातातील चार जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. त्यांना प्रांतीय राजधानी पेशावर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वाहनचालकांचा एका तीव्र वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या हवाल्याने स्थानिक वृत्तामध्ये म्हटले आहे.

पाकिस्तान अपघात न्यूज
पाकिस्तान अपघात न्यूज

By

Published : Nov 17, 2020, 4:30 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवासी वाहन खड्ड्यात कोसळल्याने 8 जण ठार तर 11 जण जखमी झाले. हा अपघात नौशेरा जिल्ह्यातील काका साहिब रोडवर झाला. नौशेराचे अतिरिक्त उपायुक्त नूर वली खान यांनी वृत्तसंस्था सिन्हुआशी बोलताना ही माहिती सांगितली.

हेही वाचा -बलात्काऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानं मुलीला लावलं पणाला

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी व मृतांना जवळच्या रुग्णालयात पाठविले. स्थानिक लोकही बचाव कार्यात मदत करण्यासाठी पुढे आले.

या अपघातातील चार जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. त्यांना प्रांतीय राजधानी पेशावर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वाहनचालकांचा एका तीव्र वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या हवाल्याने स्थानिक वृत्तामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -इथिओपियामध्ये बसवर दहशतवादी हल्ला; ३४ ठार

ABOUT THE AUTHOR

...view details