वेलिंग्टन -सामान्यपणे चहा-कॉफी पिल्यानंतर आपण त्याचे कप टाकून देतो. त्यामुळे कचऱ्याची समस्या तयार होते. हेच कप जर खाता आले तर? एअर न्यूझीलंडने आपल्या विमानांमध्ये खाण्यायोग्य कॉफी कप आणले आहेत. विमानांमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून एअर न्यूझीलंडने हा अनोखा प्रयोग केला आहे.
खाण्यायोग्य कॉफी कप निर्मितीसाठी एअर न्यूझीलंडने 'ट्वीसी' या कप निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत करारही केला आहे. सुरूवातीला 'व्हॅनिला फ्लेवर'मध्ये हे कॉफी कप तयार केले आहेत. त्यात कुठलाही उष्ण द्रव खाद्यपदार्थ टाकला तरी तो विरघळत नाही.