मनिला - फिलिपिन्सच्या लुझॉन बेटावरील बटांगस प्रांतात शुक्रवारी 6.3 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.
वृत्तसंस्था सिन्हुआच्या वृत्तानुसार, फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजी अँड व्हॉल्केनोलॉजी (फिव्होल्कस) च्या अहवालानुसार सकाळी 7.43 वाजता हा भूकंप झाला. हे केंद्र किलागान शहराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला सुमारे 102 किलोमीटरच्या खोलीवर होते. मेट्रो मनिला आणि लगतच्या बटांगस, लगुना, कॅव्हिट, रिझाल प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले.
हेही वाचा -कोरोना ३.०? ब्रिटनमध्ये आढळले कोरोनाचे आणखी एक विकसीत रुप; जुन्या विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य
या भूकंपानंतर आणखी धक्केही बसू शकतात. परंतु, त्यामुळे नुकसान होणार नाही, असे संस्थेने म्हटले आहे. फिव्होल्कासचे संचालक रेनाटो सॉलिडियम म्हणाले की, भूकंपामुळे त्सुनामीचे संकट उद्भवणार नाही.
त्याचबरोबर, राष्ट्रीय आपत्ती जोखीम आणि व्यवस्थापन परिषदेचे (नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अॅण्ड मॅनेजमेंट काउंसिल) प्रवक्ते म्हणाले की, भूकंपामुळे आतापर्यंत नुकसान होण्याची कोणतीही बातमी आलेली नाही.
फिलिपिन्स पॅसिफिक 'रिंग ऑफ फायर' मध्ये येत असल्याने येथे अधूनमधून भूकंप होतात.
हेही वाचा -ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान; गेल्या 24 तासांत 744 जणांचा मृत्यू , तर 39 हजार बाधित