महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकिस्तानमध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

सिन्हुआशी बोलताना पाकिस्तान हवामान खात्याचे महासंचालक मुहम्मद रियाझ म्हणाले की, हा उथळ भूकंप होता आणि लोकसंख्या जास्त असलेल्या भागात याचे केंद्र असते तर, मोठे नुकसान झाले असते. याची अधिक तपासणी केली जात आहे. क्वेटा व्यतिरिक्त मुस्तंग, किल्ला अब्दुल्ला आणि पिशिन जिल्ह्यांसह प्रांताच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

पाकिस्तान भूकंप बातमी
पाकिस्तान भूकंप बातमी

By

Published : Nov 14, 2020, 7:57 PM IST

क्वेटा - शनिवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल होती. देशाच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटरने याबाबत माहिती दिली आहे. केंद्राद्वारे याबाबतची माहिती शेअर केलेली आहे.

यासंदर्भात सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, भूकंप हे केंद्र प्रांताची राजधानी क्वेटापासून 38 किलोमीटर पूर्वेस होते आणि त्याची खोली भूपृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली होती.

हेही वाचा -उत्तर कॅरोलिनातील पुरात 7 ठार, 2 बेपत्ता

क्वेटा व्यतिरिक्त मुस्तंग, किल्ला अब्दुल्ला आणि पिशिन जिल्ह्यांसह प्रांताच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

सिन्हुआशी बोलताना पाकिस्तान हवामान खात्याचे महासंचालक मुहम्मद रियाझ म्हणाले की, हा उथळ भूकंप होता आणि लोकसंख्या जास्त असलेल्या भागात याचे केंद्र असते तर, मोठे नुकसान झाले असते. याची अधिक तपासणी केली जात आहे.

जिल्ह्यासह आजूबाजूच्या भागात भूकंपाच्या परिणामांचा शोध घेण्यात येत असल्याचे क्वेटा पोलीस सूत्रांनी सांगितले. भूकंप होण्याची शक्यता असलेल्या भागांपैकी एक असलेल्या पाकिस्तानमध्ये काही गंभीर भूकंपांचा इतिहास आहे.

हेही वाचा -फिलीपाईन्समध्ये चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 53 वर

ABOUT THE AUTHOR

...view details