ढाका - भारताच्या लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व कायदा सुधारणा विधयेक (CAB) पारित झाले. या विधयकानुसार, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानात छळ होत असलेल्या आणि तेथून निर्वासित झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समाजांना भारताचे नागरिकत्व देता येणार आहे. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी बांग्लादेशात धार्मिक सलोखा असल्याचे म्हटले आहे.
'असे अत्यंत कमी देश आहेत जेथे सांप्रदायिक आणि धार्मिक सलोखा पहायला मिळतो. त्यात बांग्लादेशचाही समावेश होते. अमित शाह काही महिने बांग्लादेशात राहिले, तर त्यांना देशात अत्यंत चांगल्या प्रकारे सांप्रदायिक आणि धार्मिक सलोखा असलेला पहायला मिळेल,' असे अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे.