महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

काबूल आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यातील मृतांची संख्या 30 वर, इस्लामिक स्टेटने घेतली जबबादारी - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट न्यूज

शनिवारी रात्री उशिरा एका आत्मघातकी हल्लेखोराने काबुलच्या पश्चिम दश्त-ए-बारची शेजारच्या पुल-ए-खोश्क भागात काव्सर ए-दानिश शिक्षण केंद्राजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला. हे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम शिकवणारे खासगी शैक्षणिक केंद्र असल्याचे आणखी एका वृत्तसंस्थेने गृह मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले आहे. शिया मुस्लिमबहुल असलेल्या दश्त-ए-बारची या भागात शेकडो विद्यार्थी या इमारतीत राहतात. हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

काबूल आत्मघातकी बॉम्ब हल्ला न्यूज
काबूल आत्मघातकी बॉम्ब हल्ला न्यूज

By

Published : Oct 25, 2020, 1:01 PM IST

काबूल - अफगाणिस्तानच्या राजधानीतील शिक्षण केंद्राजवळ झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात मृतांचा आकडा 30 वर गेला आहे. तर, तब्बल 70 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सुरक्षा सूत्रांनी स्पुटनिक या वृत्तसंस्थेला दिली आहे. हल्लेखोर शिक्षण केंद्रात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता, असे अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाने म्हटले आहे.

दरम्यान, 'याच स्फोटातील मृतांचा आकडा 18 झाला असून इतर 50 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 37 जणांना काबूलच्या जिन्ना रुग्णालयात नेण्यात आले आहे,' अशी माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पुटनिकला सांगितली.

काबूल आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यातील मृतांची संख्या 30 वर

हेही वाचा -अफगाणिस्तानात गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचारात 180 नागरिक ठार, 375 जखमी

शनिवारी रात्री उशिरा एका आत्मघातकी हल्लेखोराने काबुलच्या पश्चिम दश्त-ए-बारची शेजारच्या पुल-ए-खोश्क भागात काव्सर ए-दानिश शिक्षण केंद्राजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला. हे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम शिकवणारे खासगी शैक्षणिक केंद्र असल्याचे आणखी एका वृत्तसंस्थेने गृह मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले आहे. शिया मुस्लिमबहुल असलेल्या दश्त-ए-बारची या भागात शेकडो विद्यार्थी या इमारतीत राहतात. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या स्फोटातील मृतांचा आकडा 13 वर पोहोचल्याचे गृह मंत्रालयाने शनिवारी सांगितले. तसेच, आणखी 30 जण जखमी झाल्याचीही माहिती दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाचे माध्यम प्रवक्ते तारिक एरियन यांनी एका मोठ्या माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आत्मघाती हल्लेखोर मध्यभागी प्रवेश करू इच्छित होता. परंतु सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना ओळखल्यानंतर त्याने एका गल्लीतच स्फोट घडवून आणला.'

काबूलमध्ये शनिवारी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. तत्पूर्वी, तालिबान्यांनी या हल्ल्याशी आपला काहीही संबंध असल्याचे नाकारले होते.

हेही वाचा -'चीनकडून पाकिस्तानचा भारताविरुद्ध एक साधन म्हणून वापर'

ABOUT THE AUTHOR

...view details