हुबेई - चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा ६३८ वर पोहोचला आहे. तर, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नागरिकांचा आकडा तब्बल ३१ हजारवर पोहोचला आहे.
डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. हुबेई प्रांताबाहेर हाँगकाँगमध्ये कोराना विषाणू संसर्गामुळे पहिला बळी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. फिलिपाईन्समध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या या आजारवर कोणताही खात्रीशीर इलाज नाही. काही ठिकाणी एचआयव्ही आणि इतर विषाणूजन्य आजारांवर देण्यात येणाऱ्या औषधांचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.