महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

दलाई लामांनी लिहिले जॅसिंडा यांना पत्र; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

"कोरोनाच्या या कठीण काळामध्ये तुम्ही दाखवलेले धैर्य, हुशारी आणि नेतृत्व याची मी प्रशंसा करतो. कोरोनाला तुम्ही ज्याप्रमाणे शांत राहून लढा दिला, त्याचे मी विशेष कौतुक करतो", असे दलाई लामांनी आपल्या पत्रामध्ये लिहिले आहे.

Dalai Lama congratulates NZ PM, wishes success in meeting challenges
न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे दलाई लामांनी केले अभिनंदन; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

By

Published : Oct 19, 2020, 1:22 PM IST

धर्मशाळा : जॅसिंडा अर्डर्न यांची न्युझीलंडच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा निवड झाली. यानंतर तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी पत्र लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोमवारी याबाबत माहिती देण्यात आली.

"कोरोनाच्या या कठीण काळामध्ये तुम्ही दाखवलेले धैर्य, हुशारी आणि नेतृत्व याची मी प्रशंसा करतो. कोरोनाला तुम्ही ज्याप्रमाणे शांत राहून लढा दिला, त्याचे मी विशेष कौतुक करतो", असे दलाई लामांनी आपल्या पत्रामध्ये लिहिले आहे. न्युझीलंडच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यामध्ये मोठ्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवत जॅसिंडा यांनी आपले पंतप्रधानपद कायम राखले.

दलाई लामा लिहितात की "तुमच्या सुंदर देशामध्ये मी काही वेळा येऊन गेलो आहे. प्रत्येक वेळी येथील लोकांनी केलेल्या आदरातिथ्याने मी भारावून गेलो आहे. जगामध्ये शांततेचा प्रसार करण्याच्या माझ्या कार्यामध्ये येथील लोकांनी दाखवलेली आवड, आणि केलेली मदत ही विलक्षण आहे."

आपल्या पत्राच्या शेवटी येथून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत दलाई लामांनी जॅसिंडा यांना भविष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांना तोंड देता यावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

हेही वाचा :कोरोनाला दिलेल्या लढ्यामुळेच मिळाला ऐतिहासिक विजय - जॅसिंडा अर्डर्न

ABOUT THE AUTHOR

...view details