महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 21, 2020, 2:52 PM IST

ETV Bharat / international

कोरोना:  ..तर संपावर जाऊ, पाकिस्तानमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा इशारा

मास्क, सुरक्षा कपडे, हातमोजे, सॅनिटायझर अशा गोष्टींचा पुरवठा रुग्णालयांना होत नाही. त्यामुळे पाकिस्तानात जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचाच जीव धोक्यात आला आहे.

पाकिस्तान कोरोना
पाकिस्तान कोरोना

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा सामना करताना पाकिस्तानची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणांचा तुटवडा भासत आहे. सरकारने सुरक्षा उपकरणे पुरवली नाही तर संपावर जाण्याचा इशारा सरकारी रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी दिला आहे.

मास्क, सुरक्षा कपडे, हातमोजे, सॅनिटायझर अशा सुरक्षा संबधी वस्तूंचा पुरवठा रुग्णालयांना होत नाही. त्यामुळे पाकिस्तानात जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचाच जीव धोक्यात आला आहे. 'आम्ही सुरक्षा उपकरणांशिवाय काम करत आहोत. जर सरकारने आम्हाला सुरक्षा उपकरणे पुरवली नाही तर आम्ही २४ मार्चपासून संपावर जाऊ', असा इशारा पाकिस्तानातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

'आम्ही सरकारकडे वारंवार सुरक्षा उपकरणांची मागणी केली आहे. मात्र, आमच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नाही', असे पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात काम करणारे डॉक्टर असफंदयार खान यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, 'अशा परिस्थितीत कामं करण आम्हाला अवघड होऊन बसलं आहे. २४ मार्चपासून आम्ही काम बंद करणार आहोत. विना सुरक्षा उपकरणांचं काम करण आत्महत्या केल्यासारखं आहे, तरीही आम्ही काम करत आहोत, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष लाभ मिळायला हवा'.

पाकिस्तानात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत ४९५ जणांना नागरिकांना लागण झाली असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सिंध प्रांतात सर्वात जास्त २५२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पंजाब आणि बलुचिस्तानात बाधितांचा आकडा ९० च्या पुढे गेला आहे. पाकिस्तानातील स्थिती भारतापेक्षाही गंभीर बनली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details