महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'कोरोना'चा कहर : चीनमध्ये आतापर्यंत ३६१ जणांचा मृत्यू

रविवारी एकाच दिवशी ५ हजार १७३ नवे रुग्ण आढळल्याचे या अहवालात म्हटले आहे. यातील १८६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय देशभरात या विषाणुचे २१ हजार ५५८ संशयित रुग्ण सापडले आहेत.

corona
कोरोना विषाणू

By

Published : Feb 3, 2020, 1:12 PM IST

Updated : Feb 3, 2020, 3:05 PM IST

बीजिंग - कोरोना विषाणुच्या संसर्गांने आतापर्यंत चीनमध्ये ३६१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या आजारामुळे रविवारी हुबेईमध्ये ५६ तर चोंगग्विंगमध्ये एका व्यक्तीने प्राण गमावला.

हेही वाचा - अबब...फडणवीस सरकारचा जाहिरातींवरचा खर्च जाणून व्हाल थक्क!

याशिवाय देशभरात १७ हजार २०५ जणांना या विषाणुची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. रविवारी एकाच दिवशी ५ हजार १७३ नवे रुग्ण आढळल्याचे या अहवालात म्हटले आहे. यातील १८६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय देशभरात या विषाणुचे २१ हजार ५५८ संशयित रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा - केरळमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण

Last Updated : Feb 3, 2020, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details