महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोना व्हायरस: चीनमध्ये मृतांचा आकडा ५६२ : भारतीय दुतावासाने जारी केले हॉटलाईन नंबर - कोरोना व्हायरस मृत्यू भारत

कोरोनाचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.

कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस

By

Published : Feb 6, 2020, 5:38 PM IST

बीजिंग - चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ हजार नागरिक कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.

आणिबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना यावर संपर्क साधता येणार आहे. भारतीय दुतावास हुबेई प्रांतीतल नागरिकांना मदत करतच आहे. काही गरज पडल्यास चीनी प्रशासनातील विविध विभागांचे नंबर आणि ईमेल शेअर करत असल्याचे ट्विट परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. या संपर्कामध्ये चीनी विद्याीपीठांचेही नंबर देण्यात आले आहेत.

हुबेई प्रांताबाहेर हाँगकाँगमध्ये कोराना विषाणू संसर्गामुळे पहिला बळी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. फिलिपाईन्समध्येही एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांनी चीनमध्ये जाण्यास आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. भारत, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेशसह अनेक देशांनी हुबेई प्रांतामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे.कोरोना व्हायरसमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात अडचणी येत असल्याचे चीनने मान्य केले आहे. हुबेई प्रांतामध्ये ५ कोटी नागरिक घरामध्ये अडकून पडले आहेत. त्या सर्वांना अन्नधान्य आणि सेवा पुरवण्यास अडथळे येत असल्याचे चीनने मान्य केले आहे. हुबेई प्रांताचा चीनच्या इतर प्रांताशी संपर्क तोडण्यात आला आहे. हुबेई प्रांतामध्ये सगळीकडे औषध फवारणी सुरू केली आहे. चीनमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तरीही उपचारांना प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे डॉक्टरांना आशेचा किरण दिसला आहे. चीनमध्ये आतापर्यंत ६३२ रुग्ण यातून बरे झाले असल्याची माहिती चीन सरकारने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details