वॉशिंग्टन डी. सी - कोरोना महामारीमुळे जगभरात 2 लाखांपेक्षा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 2 लाख 3 हजार 803 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 29 लाख 40 हजार 59 जण एकूण बाधित आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 8 लाख 41 हजार 751 जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.
कोरोनामुळे जगभरात 2 लाखांपेक्षा जास्त मृत्यू; 29 लाख 40 हजार बाधित
अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 9 लाख 60 हजार 896 कोरोनाबाधित एकट्या अमेरिकेत आढळले आहेत.
अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 9 लाख 60 हजार 896 कोरोनाबाधित एकट्या अमेरिकेत आढळले आहेत. तर 54 हजार 256 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल फ्रान्स, इटली, स्पेनमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. जागतिक व्यापार, उद्योग, पर्यटन, वाहतूक सर्व खोळंबली असून जगावर आरोग्य आणीबाणी आली आहे. अनेक देशांना वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे, त्यातच रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.