बीजिंग - चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६५ लोकांनी या विषाणूमुळे आपला प्राण गमावला आहे. तर, आतापर्यंत जवळपास २०,४३८ लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. हे तिघेही केरळमध्ये आढळून आले आहेत. केरळ सरकारने कोरोनाला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या तीनही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.