महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोना कहर : जगभरात मृतांचा आकडा १० हजारांच्या पुढे; सुमारे अडीच लाख बाधित

इटली आणि चीनमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इराणमध्ये १ हजार २८४ नागरिक दगावले आहेत. यासोबतच स्पेन, जर्मनी, अमेरिका, फ्रान्स आणि जगभरातील विविध खंडात रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोना कहर
कोरोना कहर

By

Published : Mar 20, 2020, 1:55 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये आत्तापर्यंत १० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. चीन, इटली आणि इराणमध्ये कोरोनामुळे सर्वात जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये चीनपेक्षाही जास्त मृत्यू झाले आहेत.

इटली आणि चीनमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इराणमध्ये १ हजार २८४ नागरिक दगावले आहेत. यासोबतच स्पेन, जर्मनी, अमेरिका फ्रान्स आणि जगभरातील विविध खंडात रुग्णांची संख्या वाढत आहे. इटलीमध्ये काल दिवसभरात ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ज्या देशांमध्ये कोरोनाची जास्त लागण झाली आहे, त्या देशामध्ये खबरबारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरे बंद ठेवण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास बंद करण्यात आला असून देशाच्या सीमारेषांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून सशयितांवर आणि कोरोनाग्रस्तांवर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.

कोरोना जगापुढे संकट

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्गाला जागतिक महामारी घोषित केली आहे. चीनमधील वुहान प्रांतात प्रथम आढळलेला कोरोना आता जगभरामध्ये पसरला आहे. त्यामुळे आरोग्य आणीबाणीची जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे. गरीब आणि विकसनशील देशांची परिस्थिती हाताळताना दमछाक होत आहे. आंतराराष्ट्रीय प्रवास पूर्णपणे ठप्प झाला आहे. विषाणूचा प्रसार थांबण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. त्यामुळे सर्व देश कोरोनाचा बिमोड करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.

भारताचे सावध पाऊल

भारतानेही २९ मार्चपर्यंत सर्व आंतराष्ट्रीय उड्डाने रद्द केली आहेत. भारतातही कोरोनाचे २०६ रुग्ण आढूळून आले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व राज्ये हाय अलर्टवर असून संशयितांची तपासणी तत्काळ करण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांना १४ दिवस एकांतवासात थांबण्याचे सांगण्यात आले आहे. देशातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तर उद्योग व्यवसायही थांबले आहेत. आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांमध्ये सतत जागरुकता करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details