महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकिस्तानने नव्या वादाला तोंड फोडले, वॉर म्युझियमध्ये लावला विंग कमांडर अभिनंदन यांचा पुतळा - वॉर म्युझियमध्ये लावला विंग कमांडर अभिनंदन यांचा पुतळा

पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

पाकिस्तानने नव्या वादाला तोंड फोडले

By

Published : Nov 10, 2019, 7:18 PM IST

इस्लामाबाद -पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचा पुतळा पाकिस्तानने आपल्या कराची येथील वायू दलाच्या वॉर म्युझियमध्ये लावला आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने हे छायाचित्र आपल्या टि्वटवर शेअर केले आहे.


संबधीत छायाचित्रामध्ये अभिनंदन यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे एक पाकिस्तानी सैनिक असल्याचे पाहायला मिळत आहे. याचबरोबर कपाटावर एक कॉफी मग देखील ठेवण्यात आला आहे. ज्यावेळी अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यावेळची परिस्थिती त्यांनी दर्शवली आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


4 महिन्यापुर्वीदेखील पाकिस्ताने एका जाहिरातीमधून वादाला तोंड फोडले होते. पाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्तमानची नक्कल आणि हेटाळणी करणारी एक जाहिरात दाखवली होती. अत्यंत संवेदनशील विषयावर या जाहिरातीत हेटाळणी करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details