वॉशिंग्टन :चीनच्या विषाणूशास्त्रज्ञ ली-मेंग यॅन यंनी कोरोना विषाणूच्या उगमाबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर त्यांना चीनमधून निघून जाण्यास सांगण्यास आले होते. कोरोना विषाणू हा चीनमधील प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आल्याचे यॅन यांचे मत होते. अमेरिकेतील एका मुलाखतीमध्ये यॅन यांनी आता पुन्हा एकदा हा दावा केला आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि चीन सरकारनेही यॅन यांचा यापूर्वीचा दावा फेटाळून लावला होता. या नव्या मुलाखतीत यॅन म्हणतात, की चिनी लष्कराच्या प्रयोगशाळेत झोऊशान बॅट कोरोनाव्हायरस, झेडसी४५ आणि झेडएक्स२१ हे विषाणू तयार करण्यात आले होते. याबाबत त्यांचा वैद्यकीय अहवाल त्या लवकरच प्रकाशित करणार असल्याचेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले. चीनच्या लष्करानेच हा विषाणू तयार केल्याचा दावा यॅन यांनी यापूर्वी ताईवान न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही केला होता, ज्यानंतर त्यांना चीनमधून बाहेर काढण्यात आले होते.