बीजिंग :भारत आणि चीनच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांनी मागे हटण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती चीनी परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पँगॉग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणी भागावर तैनात असलेले सैन्यदल आजपासून (बुधवार) मागे घेण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चीनी माध्यमांनी दिली माहिती..
याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वु कियान यांनी सैन्य मागे घेतले जात असल्याबाबत माहिती दिली. त्यांच्या या वक्तव्याबाबत चीनीच्या अधिकृत माध्यमांनी वृत्त दिले आहे.