महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

प्रलंबित सीमा प्रश्न सोडवण्यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री व अजित डोवाल  यांच्यात आज चर्चा - india china meeting news

चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग ई आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये आज(शनिवारी) दिल्लीमध्ये उच्चस्तरीय चर्चा होणार आहे. विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेची ही  २२ वी फेरी आहे.डोवाल

china india meet
अजित दोवाल आणि वाँग ई

By

Published : Dec 21, 2019, 9:22 AM IST

Updated : Dec 21, 2019, 9:28 AM IST

नवी दिल्ली - अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला भारत- चीन सीमावाद सुटलेला नाही. भारताच्या ईशान्यकडील भुप्रदेशावर चीन आपला दावा सांगत आहे. या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग ई आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये आज (शनिवारी) दिल्लीमध्ये उच्चस्तरीय चर्चा होणार आहे. विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेची ही २२ वी फेरी आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिंनपींग आणि पंतप्रधान मोदींमध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तामिळनाडूमधील ममल्लापूरम येथे अनौपचारीक बैठक झाली होती. त्यानंतर चीनची ही दुसरी उच्चस्तरीय भेट आहे. भारताने क्षेत्रिय आर्थिक विकास सहकार्य योजनेतील आपला सहभाग काढून घेतल्यानंतरची चीनची ही पहिलीच उच्चस्तरीय भेट आहे.

विषेश प्रतिनिधी स्तरावरील या बैठकीत सीमा प्रश्नावर चर्चा होणार आहे. याबाबतची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. अजित डोवालआणि वाँग या दोघांमध्ये ही चर्चा होणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील शी जिनपींग आणि मोदी यांच्या भेटीत घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सप्टेंबर महिन्यातच वाँग भारताला भेट देणार होते. मात्र, त्यांची भेट पुढे ढकलण्यात आली होती.

विशेष प्रतिनिधी स्तरावरील २१ चर्चेच्या फेऱ्या दोन्ही देशांमध्ये झालेल्या आहेत. यामध्ये सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासंबधींच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. सीमेवर शांतता पाळण्यासाठी दोन्ही देश यातून प्रयत्न करणार आहेत.

भारत आणि चीनदरम्यान ३ हजार ४८८ कि. मी लांबीची सीमा रेषा आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे. मात्र, भारताला तो मान्य नाही. यासोबतच अक्साई चीन प्रदेशातही दोन्ही देशांमध्ये सीमा रेषेवरून वाद आहे. सीमा वादावरून दोन्ही देशांमध्ये १९६२ साली युद्ध झाले आहे. तसेच त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या चकमकीही झाल्या आहेत.

Last Updated : Dec 21, 2019, 9:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details