बिजिंग- चीन सरकारने अमेरिका स्थित ब्लुमबर्ग वृत्तवाहीनीसाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराला ताब्यात घेतले आहे. हा पत्रकार चिनी नागरिक असून त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. अमेरिकेतील फायनान्शिअल एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
साध्या वेशात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी हेझ फॅन या पत्रकाराला सोमवारी दुपारी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. वृत्तपत्राच्या संपादकाशी संपर्क झाल्यानंतर काही वेळातच फॅन यांना ताब्यात घेण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घातल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून या प्रकरणाचा गुन्हा कठोर प्रकारात मोडतो. या गुन्ह्यात न्यायालयीन सहाय्यही मिळण्याची शक्यता कमी असते.