कोरोनाविषाणुचा सामना करण्यात चीनने केलेल्या प्रगतीबाबत समाजमाध्यमांमध्ये अनेक वाद आणि कट रचल्याचे सिद्धांत फिरत असले तरीही, चीनी अधिकार्यांनी काही साधी पावले कोरोनाविषाणुचा प्रसार रोखण्यासाठी उचलली.
वुहानचा संपर्क उर्वरित देशापासून तोडला..
कोरोना विषाणुचे केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहराचा उर्वरित देशाशी असलेला संपर्क २३ जानेवारी २०२० रोजीच तोडण्यात आला होता. २३ जानेवारी २०२० रोजी रात्री २ वाजता, अधिकार्यांनी वुहानच्या नागरिकांना एका नोटिसीद्वारे माहिती दिली की, सकाळी १० वाजल्यापासून सर्व बसेस, रेल्वे, विमाने, आणि बोटी आदीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्थगित करण्यात येईल. वुहानच्या नागरिकांना अधिकार्यांच्या परवानगीशिवाय शहर सोडण्यास मनाई करण्यात आली.
सॅनिटायझरचा शिडकावा..
विषाणुने कोणताही पृष्ठभागावर परिणाम करण्याची शक्यता दूर करण्यासाठी रस्ते, बोगदे आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधा यांच्यावर मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा शिडकावा करण्यात आला. पीपल्स बँक ऑफ चायनानेही संसर्गाचा संभव असलेल्या नोटा नष्ट करून अत्यंत खोलवर स्वच्छता केली. चीनी शहरांनी निर्जंतुकीकरणाचे बोगदे उभारून त्याद्वारे धुके पसरले ज्यामुळे ९९ टक्के विषाणु मरतात.
आरोग्य संहिता..
सार्वजनिक चांगल्यासाठी आपल्या अत्यंत आधुनिक आणि विस्तारित टेहळणी नेटवर्कचा उपयोग करून, चीनी सरकारने अलिबाबा आणि टेन्संट अशा तांत्रिकदृष्ट्या विराट कंपन्यांशी हातमिळवणी करून रंगसंहिता असलेली आरोग्य दर्जा प्रणाली विकसित केली. त्याद्वारे दररोज लाखो लोकांवर नजर ठेवण्यात आली.
दूरवरच्या भागांमध्ये तात्पुरत्या रूग्णालयांची उभारणी..
चीनने केवळ १० दिवसांमध्ये हुओशेनशानमध्ये ७ हजार सुतार, प्लंबर, वीजतंत्री आणि इतर विशेषज्ञांच्या कामगार शक्तीच्या जोरावर तात्पुरते रूग्णालय उभारले. ६,४५,००० चौरस फुट क्षेत्रातील ही तात्पुरती वैद्यकीय सुविधा १००० खाटा आणि अनेक विलगीकरण कक्ष तसेच ३० अतिदक्षता विभाग यांनी सुरू होतानाच सुसज्ज होती. पाया बांधण्यासाठी त्यांनी पूर्वनिर्मित युनिट्सचा वापर केला आणि अगोदर पाया आणि नंतर त्यावर इमारत अशी पारंपरिक पद्धत न वापरता चीनने रूग्णालय इमारतीसाठी समांतर पद्धत वापरली.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग बंद केले..
शहरांना लॉकडाऊनमध्ये ठेवण्यास सुरूवात करताक्षणापासूनच त्यांनी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग बंद करण्यास सुरूवात केली. यामुळे कोरोनाविषाणुच्या प्रसाराची शक्यता पूर्वी होती त्यापेक्षा खूपच कमी झाली आणि आजारी लोकांना एकाच भागात नियंत्रित करता आले. २३ जानेवारीला सरकारी माध्यमांनी वुहानच्या भोवतालचे महामार्गावरील टोल नाके बंद होत असल्याचे वृत्त दिले आणि त्यामुळे बाहेर पडण्याचे मार्गही परिणामकारकरित्या बंद करण्यात आले. गस्त घालण्यासाठी रक्षकांना तैनात करण्यात आले.
ड्रोन्सचा वापर..
अत्यंत तीव्र परिणाम झालेल्या काही भागांमध्ये, वैद्यकीय उपकरणे आणि रूग्णांच्या नमुन्यांची वाहतूक करण्यासाठी ड्रोन्स मदतीला धावून आले आहेत. यामुळे वेळेची बचत झाली, वाहून नेण्याचा वेग वाढला आणि नमुन्यांमध्ये संक्रमण होण्याचा धोका टाळला गेला. ड्रोन्स क्यूआर कोड फलक घेऊनही उडत असल्याने त्यांना आरोग्यविषयक माहितीसाठी स्कॅन करता येऊ शकते. काही कृषीविषयक ड्रोन्सही आहेत जे बाहेरच्या शेतांमध्ये जंतुनाशक द्रव्यांची फवारणी करत आहेत. चेहरा ओळखण्याची क्षमता असलेल्या ड्रोन्सचा उपयोग नागरिकांना घरांच्या बाहेर पडू नका याचे इशारे देण्यासाठी तसेच जे मास्क घालत नाहीत त्यांना दटावण्यासाठीही केला जात आहे.