महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अवघ्या १० दिवसात कोरोना बाधितांसाठी बांधलं रुग्णालय, उपचार सुरू

जवळपास ७ हजार कामगारांनी युद्धपातळीवर काम करून वुहानमध्ये 'होऊशेनशान' हे खास कोरोना बाधितांसाठी रुग्णालय उभारण्यात आले आहे. मध्य चीनच्या याच शहरामध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळला होता.

corona
अवघ्या १० दिवसात कोरोना बाधितांसाठी बांधलं रुग्णालय

By

Published : Feb 3, 2020, 2:52 PM IST

बीजिंग - चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या आजारामुळे दिवसेंदिवस बळींची संख्या वाढत चालली असून आकडा ३६१ वर पोहोचला आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी चीन सरकारने अवघ्या १० दिवसात विशेष रुग्णालय बांधले. या रुग्णालयामध्ये काही रुग्णांवर उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचा - केरळमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण

जवळपास ७ हजार कामगारांनी युद्धपातळीवर काम करून वुहानमध्ये 'होऊशेनशान' हे खास कोरोना बाधितांसाठी रुग्णालय उभारले आहे. मध्य चीनच्या याच शहरामध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळला होता. या आजारामुळे परिसरातील जवळपास ११ दशलक्ष नागरिकांना घरातच राहावे लागत आहे.

हेही वाचा - चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी सरकारवर नाराज, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप..

सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या लष्करी शाखेसह पिपल्स लिबरेशन आर्मीने १४०० डॉक्टरांच्या पथकासह परिचारक आणि इतर कर्मचारी वर्ग वुहानच्या या रुग्णालयात पाठवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसराला जोडणारे रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा काही दिवसांसाठी प्रशासनाने बंद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details