मसुद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मुद्यावर चीनने दिले आडकाठीचे संकेत - मसूद अजहर
'मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे,' अशी मागणी भारताने सुरक्षा परिषदेकडे केली होती. फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने पुढाकार घेत हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडला आहे. या प्रस्तावावर आज अंतिम निर्णय होणार आहे. हा प्रस्ताव २७ फेब्रुवारीला चौथ्यांदा दाखल करण्यात आला होता.
बीजिंग - पुलवामा हल्ल्याचा सुत्रधार जैश-ए-महंम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीनने पुन्हा एकदा आडकाठी घालण्याचे संकेत दिले आहेत. भारताने मसूद विरोधात भक्कम आणि स्वीकारार्ह पुरावे द्यावेत असे चीनने आज पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे. दरम्यान, आज मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अंतिम निर्णय येणार आहे.
'मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे,' अशी मागणी भारताने सुरक्षा परिषदेकडे केली होती. फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने पुढाकार घेत हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडला आहे. या प्रस्तावावर आज अंतिम निर्णय होणार आहे. हा प्रस्ताव २७ फेब्रुवारीला चौथ्यांदा दाखल करण्यात आला होता.
मात्र, यापूर्वी प्रत्येक वेळी चीनने व्हेटोचा अधिकार वापरून मसूद अझहर आणि पाकिस्तानला वाचवले होते. यामुळे चीनच्या भूमिकेवर जगभरातून टीका होत आहे. त्यानंतर तो 'नो-ऑब्जेक्शन'साठी १० कार्यालयीन दिवसांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आला होता. ही मुदत आज संपत आहे.
चीनने यापूर्वीही मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्याच्या प्रयत्नांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.