महाराष्ट्र

maharashtra

हाॅंगकाॅंगला स्वायत्ततेचा दर्जा देण्यावर चीनचा जळफळाट; 'हा' घेतला निर्णय

By

Published : Jul 15, 2020, 1:32 PM IST

चीनने कोरोना विषाणूची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केले आहेत. या आरोपावरून चीन आणि अमेरिकन सरकारमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या उडत आहेत.

संग्रहित
संग्रहित

बीजिंग - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगला स्वायत्ततेचा दर्जा बहाल करणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी चीनकडून हॉंगकॉंगच्या नागरिकांना अन्याय वागणूक मिळत असल्याची टीका केली. यावर चीनने प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि संस्थेवर निर्बंध लादणार असल्याचे जाहीर करत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

चीनने कोरोनाविषाणूची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केले आहेत. या आरोपावरून चीन आणि अमेरिकन सरकारमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या उडत आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अमेरिकेत वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प हे टीकेचे धनी ठरले आहेत.

हाँगकाॅंगप्रकरणी अमेरिका अंतर्गत हस्तक्षेप करत आहे, असा आक्षेप घेत चीनने ट्रम्प प्रशासनाला इशारा दिला आहे. चिनी माध्यमांच्या माहितीनुसार, चीन सरकारने अमेरिकेला भूमिका बदलण्याविषयी सांगितले आहे. तसेच चीनच्या अंतर्गत बाबींविषयी हस्तक्षेप करू नये, असे बजावले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details