महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चीनमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचा एकही नवा बळी नाही; स्थानिक रुग्णांची संख्याही शून्यावर - कोरोना चीनमधील रुग्ण

कोरोना या विषाणूचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या चीनने या विषाणूवर विजय मिळवला आहे. चीनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये एकाही स्थानिक रुग्णाची नोंद झाली नाही, तसेच एकाही नव्या बळीची नोंद झाली नाहीये.

China reports no new deaths from virus in last 24 hrs
चीनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचा एकही नवा बळी नाही; स्थानिक रुग्णांची संख्याही शून्यावर..

By

Published : Apr 7, 2020, 5:55 PM IST

बीजिंग- मंगळवारी पहिल्यांदाच चीनमध्ये कोरोनाच्या एकाही नवीन बळीची नोंद झाली नाही. तसेच, देशात एका दिवसामध्ये कोरोनाचे केवळ ३२ नवे रुग्ण आढळून आले. हे सर्वच्या सर्व दुसऱ्या देशांमधून चीनला परतले होते.

कोरोनाचा उगम झाल्यापासून चीनमधील नव्या रुग्णांची आणि बळींची संख्या झपाट्याने वाढत होती. गेल्या काही आठवड्यांपासून मात्र चीनमधील कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचा दर एकदम कमी झाला होता. तरीही काही प्रमाणात नवे रुग्ण आणि बळी आढळणे सुरूच होते. मंगळवारी मात्र चीनमध्ये कोरोनाचा एकही नवा बळी आढळून आला नाही. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचा एकही स्थानिक नवा रुग्ण देशात आढळून आला नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

देशात गेल्या २४ तासांमध्ये आढळून आलेले सर्व ३२ रुग्ण हे विदेशातून परतलेले नागरिक आहेत. तसेच, अशाच दुसऱ्या देशांमधून परतलेल्या १२ नागरिकांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. चीनमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सध्या १,२४२ आहे. तसेच आणखी १,०३३ संभाव्य रुग्णांना विलगीकरण आणि निरिक्षण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा :जपानमध्ये आणीबाणीची घोषणा; राजधानी टोकियोसह 6 भागातील कारभार गव्हर्नरकडे

ABOUT THE AUTHOR

...view details