महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक, एका दिवसात आढळले 99 नवे रुग्ण - चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असे वाटत असतानाच आता चीनमधूनच पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. चीनमध्ये एका दिवसांमध्ये 99 कोरोनाबाधित प्रकरणे आढळली आहेत.

china-reports-nearly-99-new-coronavirus-cases-in-one-day-
china-reports-nearly-99-new-coronavirus-cases-in-one-day-

By

Published : Apr 12, 2020, 10:51 AM IST

वूहान - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असे वाटत असतानाच आता चीनमधूनच पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. चीनमध्ये एका दिवसांमध्ये 99 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 97 जण परदेशातून परत आलेले आहेत.

चीनमध्ये एकूण 82 हजार 52 कोरोनाबाधित असून 3 हजार 339 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे प्रवक्ते मी फेंग यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्ण आढळत आहेत.

कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. जगभरामध्ये कोरोना विषाणूची बाधा तब्बल 17 लाख 80 हजार 315 जणांना झाली आहे. तर कोरोनामुळे 1 लाख 8 हजार 828 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 4 लाख 4 हजार 31 जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.

चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटी कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा वुहान शहरातील प्रशासनाने याकडे गांभीर्याने घेतले नाही. उलट खोटी माहिती पसरवत असल्यावरून डॉक्टरांना तंबी दिली. पुढे जेव्हा चीनमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त झाला, या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या मृत्यूनंतर चीनमध्ये संतापाची लाट पसरली होती.मात्र, कोरोना चीनमधून आला यास पुरावे नसल्याचे चीनने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details