बिजींग -जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी प्रस्ताव सादर केला होता. याबाबत चीनने आडमुठी भूमिका घेतली होती, आता मात्र चीन याबाबत पाऊल मागे आला आहे. आज मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे.
चीनने मंगळवारी सांगितले की, मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नात वेग आला आहे. हा विषय योग्य पध्दतीने हाताळण्यात यावा अशी आशा आहे. मात्र, याबाबतचा निर्णय कधीपर्यंत घेणार याबाबत चीनने सांगितले नाही.