गुईयांग -नैऋत्य चीनमध्ये दगडी कोळसा आणि नैसर्गिक वायू खाणीत स्फोटात आतापर्यंत 16 खाण कामगारांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री 1:30 वाजता गुईझौ प्रांतात हा स्फोट झाला.
ग्वांगलाँग असे या खाणीचे नाव असून स्फोटावेळी 23 कामगार जमिनीखाली खाणीत होते. यापैकी 7 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
बचावकार्य अजूनही सुरू असून या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे.
चीन हा जगातील सर्वांत मोठा दगडी कोळसा उत्पादक देश आहे. येथे खाणींमध्ये नेहमीच अपघात होत राहतात. अलीकडच्या काही दिवसांमध्ये या स्फोटांचे प्रमाण कमी असले तरी, नोव्हेंबर महिन्यातच येथे एक मोठा अपघात झाला होता. यात 15 कामगार ठार झाले होते. तर, ९ जण जखमी झाले होते. उत्तर चीनमधील शांग्झी प्रांतात हा स्फोट झाला होता.