नवी दिल्ली - दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आला आहे. दहशतवाद्यांना दोषी ठरवून शिक्षा देण्यासाठी पाकिस्तानला जूनपर्यंतची मुदत दिली जाणार आहे. पाकिस्तानला कायम साथ देणाऱ्या चीनने 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स'च्या बैठकीत भारताची साथ दिली आहे. दहशतवादाला पैसा पुरवण्याविरोधात आणि मनी लाँड्रिग रोखण्यासाठी पाकिस्तानने कडक पावले उचलावीत, असा संदेश जाण्यासाठी चीनने भारताला साथ दिली आहे.
दहशतवाद्यांविरोधात पुरेसी कारवाई केल्याचे म्हणत एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून काढून टाकावे, अशी मागणी पाकिस्तानची होती. मात्र, पाकिस्तानला दहशतवादी आणि त्यांना होणारा रसद पुरवठा थांबवण्यासाठी आणखी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा पुन्हा फाटला आहे.