बिंजिंग - चीन आणि रशियामधून पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून परतलेल्या कोरोनाने जगभरातील देशांना चिंतेत टाकलं आहे. तर रशियामध्येही कोरोना प्रसार वेगाने वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. वर्ष 2019 मध्ये चीनच्या हुबेई प्रांतातल्या वुहान शहरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला होता. वूहानमधून तो झपाट्याने आधी चीनच्या अनेक प्रांतात आणि मग जगभरात पसरला होता. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाशीझुंज देत आहे.
चीनमध्ये सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता आता चीन सरकारने तातडीने पावले उचलायला सुरूवात केली आहे. आपत्कालीन उपाययोजनांचा भाग म्हणूनच आता चीनमध्ये फ्लाईट्स रद्द केल्या जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले जात आहेत. जगभरात चीनमधूनच कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले होते. आता पुन्हा चीनमध्ये आढळलेल्या कोरोनाने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीन प्रशासनाकडून आता तातडीने उपाययोजना करायला सुरूवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणूनच चीनने मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करायला सुरूवात केली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले आहे. तर पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा प्रसार झाल्यास प्रशासनाने म्हटलं आहे. तर चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरात कोरोनाचे संक्रमण हे अतिशय वेगाने पसरत असल्याची माहिती आहे.
रशियात कोरोनाची पुन्हा लाट -