काबूल -अफगाणिस्तानातील काबूलमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या कार बॉम्बस्फोटात ७ जण ठार झाले. यात आणखी ७ जण जखमी झाले आहेत. येथील मंत्रालयाने ही माहिती दिली.
काबूलमध्ये कार बॉम्बस्फोट, ७ ठार - kabul bomb blast
स्थानिक वेळेनुसार, सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी कासाबा परिसरात हा स्फोट झाला, अशी माहिती मंत्रालयाचे प्रवक्ते नसरत रहीमी यांनी दिली.
काबूलमध्ये कार बॉम्बस्फोट
स्थानिक वेळेनुसार, सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी कासाबा परिसरात हा स्फोट झाला, अशी माहिती मंत्रालयाचे प्रवक्ते नसरत रहीमी यांनी दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटात अनेक वाहनांचेही नुकसान झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.