दुबई- नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) हे भारताचे अंतर्गत मुद्दे आहेत, असे मत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केले आहे. मात्र, त्याचवेळी या दोनही कायद्यांची गरज नसल्याचेही त्या म्हटल्या. सीएए आणि एनआरसी या दोनही कायद्यांविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांमध्ये बऱ्याच लोकांनी आतापर्यंत आपले प्राणही गमावले आहेत.
आम्हाला कळत नाही, की भारत सरकारने हे कायदे का लागू केले आहेत. या कायद्यांची गरज नव्हती; असे मत हसीना यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले. काही आठवड्यांपूर्वी बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनीही असेच मत व्यक्त केले होेते. हे कायदे लागू करणे हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र, यामुळे देशात जी अनागोंदी माजली आहे, त्याचा शेजारी राष्ट्रांवरही परिणाम होऊ शकतो असेही ते पुढे म्हणाले होते.
हेही वाचा : नागरिकत्व सुधारणा कायदा : देश आणि परदेशात विवाद