लंडन - कोरोना व्हायरसच्या लक्षणांमुळे रुग्णालयात असलेले ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. डाऊनिंग स्ट्रीटने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन कोरोना पॉझिटिव्ह, आयसीयूत दाखल - ब्रिटीश पंतप्रधान कोरोना पॉझिटिव्ह
बोरिस जॉनसन यांना लंडनमधील थॉमस रुग्णालयामध्ये सोमवारी दाखल करण्यात आले होते. कोरोनाचे लक्षण आढळल्याने जॉनसन यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे
बोरिस जॉनसन यांना लंडनमधील थॉमस रुग्णालयामध्ये सोमवारी दाखल करण्यात आले होते. कोरोनाचे लक्षण आढळल्याने जॉनसन यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून त्यांना व्हेंटिलेटरही पुरवण्यात येत आहे.
सोमवारी त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने त्यांना आयसीयूत दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जॉनसन यांना आता आयसीयूत भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देेण्यात आली आहे.