पेशावर (पाकिस्तान) :पाकिस्तानातील वायव्येकडील पेशावर शहरात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट ( peshawar bomb blast ) झाला आहे. गर्दीच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने किमान 30पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत. तर 50हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मदत कार्य युद्धपातळीवर सुरू -
मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, किस्सा ख्वानी मार्केट ( Qissa Khwani bazaar ) परिसरातील जामिया मशिदीमध्ये नमाजदार शुक्रवारची नमाज अदा करत असताना हा स्फोट झाला. १० जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या स्फोटाची जबाबदारी तात्काळ कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. तेथील 'डॉन' या मुख्य पत्रानुसार, आतापर्यंत 30 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत.