इस्लामाबाद -मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदच्या घराबाहेर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 15 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. हाफिज सईदचे घर लाहोरच्या जोहर टाउन भागात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट इतका जोरदार होता की अनेक घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या.
हाफिज सईद हादरला, लाहोरच्या घराबाहेर झाला भयंकर स्फोट, 15 जखमी - हाफिज सईद
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या घराबाहेर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 15 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. हा हल्ला कोणी आणि का केला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हाफिज सईद
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बाजदार यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. हा हल्ला कोणी आणि का केला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हाफीज सईद हल्ल्याच्या वेळी घरात होता की नाही, याची माहिती स्पष्ट झालेली नाही. हा स्फोट खूप मोठा होता. हाफिज सईदच्या घरावर झालेला हा पहिला हल्ला नाही, यापूर्वीही हाफिज सईदवर हल्ले झाले आहेत.
Last Updated : Jun 23, 2021, 1:59 PM IST