नवी दिल्ली -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र आता अनलॉकच्या विविध टप्प्यांमध्ये अनेक गोष्टींना शिथिलता मिळत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे जवळपास गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली भारत - बांगलादेश विमानसेवा लवकरच सुरु होत आहे. बांगलादेशी एअरलाइन्स, यूएस-बांगला एअरलाइन्स आणि नोवो एअर हे तीन प्रवासी विमाने सुरुवातीच्या टप्प्यात आठवड्यातून दोनदा भारतात येण्यासाठी 28 ऑक्टोबरपासून उड्डाण करणार आहेत, अशी बातमी नागरी हवाई वाहतूक व पर्यटन मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव मो. मोहिबुल हक यांचा हवाला देत ‘डेली स्टार’ ने प्रसिद्ध केली आहे.
भारत-बांगलादेश विमानसेवेला परवानगी, 28 ऑक्टोबरपासून सुरू होणार वाहतूक?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र आता अनलॉकच्या विविध टप्प्यांमध्ये अनेक गोष्टींना शिथिलता मिळत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे जवळपास गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली भारत - बांगलादेश विमानसेवा लवकरच सुरू होत आहे.
बंग्लादेश - भारत हवाई वाहतूक
भारतातून देखील एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, विस्तारा आणि गोएअर अशा पाच कंपन्या बांगलादेशसाठी प्रवासी वाहतूक करणार आहेत. बांगलादेशातून ढाका -दिल्ली, ढाका -कोलकाता, ढाका- चेन्नई अशा या विमानसेवा असणार आहे. तर भारतीय एअरलाइन्स कंपन्या दिल्ली- ढाका, चेन्नई -ढाका, कोलकाता- ढाका, आणि मुंबई ढाका या मार्गावर सेवा देण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यामुळे बांगलादेशात अडकलेल्या भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.