महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ऑस्ट्रेलिया भारताला परत करणार 'या' दुर्मिळ कलाकृती

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीच्या निमित्ताने ऑस्टेलियन सरकार ३ दुर्मिळ आणि ऐतिहासिक भारतीय बनावटीच्या कलाकृती माघारी देणार आहेत.

दुर्मिळ कलाकृती
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Nov 27, 2019, 4:30 PM IST

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीच्या निमित्ताने ऑस्टेलियन सरकार ३ दुर्मिळ आणि ऐतिहासिक भारतीय बनावटीच्या कलाकृती माघारी देणार आहेत. या वस्तू सहाव्या, आणि पंधराव्या शतकात बनवलेल्या आहेत.

सुरक्षारक्षक म्हणजेच द्वारपालाच्या १५ व्या शतकातील २ जोड्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच ६ ते ८ व्या शतकातील राजा नागराजाची मूर्ती माघारी करण्यात येणार आहे. या कलाकृती हाताने बनवण्यात आलेल्या आहेत. ऑस्ट्रेलयाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस जानेवारी २०२० मध्ये भारत भेटीवर येणार आहेत. त्यावेळी या दुर्मिळ एतिहासिक कलाकृती भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details