महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ऑस्ट्रेलिया आगीच्या विळख्यात.. अंदाजे ४८ कोटी प्राणी दगावल्याचा अंदाज

ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात पसरलेल्या जंगलांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आगी लागल्या होत्या. मात्र, आता या आगींनी रौद्ररुप धारण केले आहे . या आगींमध्ये अंदाजे ४८ कोटी प्राणी दगावल्याचा अंदाज आहे. तर २५ नागरिकांचाही मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

By

Published : Jan 7, 2020, 4:58 PM IST

Australia burns in fire
ऑस्ट्रेलिया आगीच्या विळख्यात

सिडनी- ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात पसरलेल्या जंगलांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आगी लागल्या होत्या. मात्र, आता या आगींनी रौद्र रुप धारण केले आहे . या आगीत ८० लाख हेक्टर म्हणजेच जवळ जवळ १ कोटी ९० लाख एकर प्रदेशावर पसरलेल्या जंगलांना आगीने वेढलंय. या आगींमध्ये अंदाजे ४८ कोटी प्राणी दगावल्याचा अंदाज आहे. तर २५ नागरिकांचाही मृत्यू झालाय.

१३५ जंगलांना लागलेल्या आगी अजूनही धुमसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुर्वेकडील भागाला आगींचा सर्वाधिक फटका बसलाय. सिडनी, न्युकॅसल, मेलाकोटा, पोर्ट मॅक्वायर या शहरांजवळील जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेली आग विझवणं ऑस्ट्रेलियाला अशक्य होऊन बसलयं, तरीही देशातील आपत्ती निवारण पथकं शर्थीचे प्रयत्न करुन प्राण्यांना आणि माणसांना बाहेर काढतायत.

देशाच्या पुर्वेकडील न्यू साऊथ वेल्स भागाला आगीचा सर्वाधिक फटका बसलाय. हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. येथे उन्हाळ्या असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक आले होते, मात्र, आगीमुळे ते किनाऱ्यावरच अडकून पडलेत. कॅनबेरासहीत अनेक मोठी शहर धुरांमध्ये हरवली आहे. या आगीत जळालेल्या प्राण्यांची भयावह छायाचित्रं मन हेलावून टाकत आहेत.

ऑस्ट्रेलिया आगीच्या विळख्यात,तब्बल ४८ कोटी जनावरे दगावल्याची भीती
मागील तीन वर्षांपासून ऑस्ट्रेलयामध्ये कडक उन्हाळा आणि गंभीर दुष्काळ आहे, त्यामुळे वनांना लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले . फक्त ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या कांगारु, कोआला अशा प्राण्यांसह २५० वन्य प्राण्यांच्या प्रजाती ऑस्ट्रेलियात आहेत. या सोबतच सरपटणारे प्राणी, किटकं, पक्षांची संख्याही कमी झाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details