सिडनी - जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाप्रती एकता व्यक्त करण्यासाठी आणि जॉर्ज यांच्या मृत्यूचा निषेध दर्शवण्यासाठी ऑस्ट्रेलियन नागरिकांनी शनिवारी रॅली काढण्याचा निर्णय घेतला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यू साउथ वेल्स पोलिसांनी याला विरोध दर्शवला आहे. याप्रकरणी सरकारने सर्वोच्च न्यायालयात हा निषेध 'बेकायदेशीर समजला' पाहिजे अशी मागणी केली आहे.
‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलन केल्यास लोक एकत्र जमा होतील. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. जवळपास 10 हजार लोकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेण्याची इच्छा दर्शवली. तसेच रॅली आयोजकांनी सर्वांना फेस मास्क आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) घालण्याची व इतरांपासून अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.