कराची- पाकिस्तानमध्ये हिंदु मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. तर 150 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हिंदु मंदिरावर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय यंत्रणेवर कठोर ताशेरे ओढले होते. असे हल्ले थांबवून दोषींना अटक करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. अशा घटनांनी पाकिस्तानची प्रतिमा विदेशात डागाळत असल्याचे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले होते.
शेकडो लोकांनी हातात काठी, दगडे आणि विटा घेऊन मंदिरावर हल्ला केला होता. या हल्लायात मूर्त्या उद्धवस्त केल्या होत्या. तर काही ठिकाणी मंदिराचा भागही जाळण्यात आला होता. ही घटना रहिमायर खान जिल्ह्यातील भोंग भागामध्ये मध्ये घडली होती. स्थानिक मदरशा परिसरात 8 वर्षांच्या हिंदु मुलाने मलमूत्र विसर्जन केले होते. या प्रकरणी न्यायालयाने मुलाची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात हिंदु मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रहिम यार खान असाद सरफर्ज म्हणाले की, आम्ही 20 संशयितांना मंदिर तोडफोड प्रकरणी अटक केली आहे.
हेही वाचा-पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कर्ता, धनराज पिल्लेंसंबंधीत ईटीव्ही भारतच्या काही आठवणी
पाकिस्तानमध्ये 75 लाख हिंदु-