साओ पाउलो - ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे किमान 18 जणांचा ( 18 killed in Brazil's Sao Paulo ) मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्यपाल जोआओ डोरिया यांनी दिली आहे.
शनिवार व रविवारच्या वादळामुळे 11 प्रौढ आणि सात मुलांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 500 कुटुंबांना त्यांच्या घरातून पळून जावे लागले, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने वृत्त दिले. फ्रान्सिस्को मोराटो, फ्रँको दा रोचा, वार्झिया पॉलिस्टा, अरुजा आणि एम्बु दास आर्टेस या साओ पाउलोच्या महानगरपालिकेत आणि रिबेराव प्रेटो शहरात मृत्यूची नोंद झाली.