काबुल : उत्तर अफगाणिस्तानातील कुंडुझ प्रांतातील एका शिया मशिदीजवळ झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचे तालिबानच्या एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी हा हल्ला इस्लामिक स्टेटने घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शंभरहून अधिक दगावल्याची भिती
मशिदीत भाविकांमध्ये सहभागी झालेल्या आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला असावा असे कुंडुझ प्रांताचे उप पोलीस प्रमुख दोस्त मोहम्मद ओबैदा यांनी सांगितले. या घटनेत शंभरहून अधिक जण दगावल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. शिया बंधूंच्या सुरक्षेसाठी तालिबान सज्ज असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर असल्याचे ओबैदा म्हणाले. या घटनेचा तपास सुरू केल्याचेही ते म्हणाले.
शुक्रवारच्या नमाजदरम्यान हल्ला