बिंजींग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्याला युद्धाच्या तयारीला वेग देण्याचे आदेश दिले असून देशाच्या सार्वभौमत्वाचा बचाव करण्यास सांगितले आहे. संसद अधिवेशनात पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि पीपल्स सशस्त्र पोलीस दलाच्या प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी हे आदेश दिले आहेत.
भारत- चीन तणाव: 'युद्धाच्या तयारीला वेग द्या, शी जिनपिंग यांच्या सैन्याला सूचना' - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्याला युद्धाच्या तयारीला वेग देण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना महामारीचा चीनच्या सुरक्षा आणि विकासावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने परिस्थिती नियंत्रित केली पाहिजे. लष्करी लढाईची तयारी, प्रत्यक्ष लष्करी प्रशिक्षणे आणि सैन्य मोहिमेची कार्यवाही लष्कारची क्षमता सुधारते, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी म्हटलं आहे
दरम्यान लडाख आणि उत्तर सिक्कीममधील भारत-चीनसीमेवर दोन्ही देशांने आपले सैन्य वाढवले आहे. भारताच्या मुख्य सुरक्षा लष्कर अधिकाऱयांनी संरक्षणमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. आज सकाळपासून सुरू होणार्या सैन्य कमांडर कॉन्फरन्समध्ये या परिस्थितीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.