वॉशिंग्टन - भारताने जम्मू काश्मीरचा विषेश दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची आगपाखड सुरू आहे. या मुद्यावर आज शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये चर्चा पार पडली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविणे ही भारताची अंतर्गत बाब आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी राजदूत सय्यद अकबरुद्दीन म्हणाले आहेत.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये रशियाने भारताला तर अपेक्षेप्रमाणे चीनने पाकिस्ताला पाठिंबा दिला आहे. अकबरुद्दीन यांनी बैठकीत भारताची भूमिका मांडली. जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. हे आमचे पूर्वीपासून मत आहे. कलम 370 भारतीय सविंधानाशी जोडलेले आहे. भारतीय सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय हा लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी घेतला आहे.