नवी दिल्ली -जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला बांग्लादेशाने पाठींबा दिला आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, असे बांग्लादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकला धक्का : कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला बांग्लादेशचा पाठिंबा
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला बांग्लादेशाने पाठींबा दिला आहे.
पाकला धक्का : कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा बांग्लादेशाचा भारताला पाठींबा
कश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. आम्ही नेहमीच सिध्दांताची बाजू घेतली आहे. क्षेत्रीय शांतता, स्थिरता कायम ठेवणे आणि आपल्या राष्ट्राचा विकास करणे ही सर्वच देशांची प्राथमिकता हवी, असे बांग्लादेशाने म्हटले आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानने काश्मीर मुद्दा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानचे नापाक मनसूबे अपयशी ठरले असून रशियासह बांग्लादेशाने भारताला पाठिंबा दिला आहे.