येरवान : अर्मेनिया देशाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांच्या पत्नी अॅना हाकोब्यान या आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आता सीमेवर जाणार आहेत. लष्करी प्रशिक्षण घेणाऱ्या १३ महिलांच्या पथकामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. या प्रशिक्षणानंतर त्या नागोर्नो-काराबाख सीमेवर जातील.
फेसबुकवरुन दिली माहिती..
हाकोब्यान यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन याबाबत माहिती दिली. "१३ महिलांचे एक पथक -ज्यामध्ये आपणही असणार आहे- हे लवकरच अर्मेनियाच्या लष्करामध्ये सहभागी होत आहे. अझरबैजानच्या सैन्याला लढा देण्यासाठी नागोर्नो-काराबाख सीमेवर आम्ही जाणार आहोत" अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती.